निवेदन

नूतन वर्षाच्या समस्त महाजन कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच श्री चरणी इच्छा. आपण आज पर्यंत जे संयम आणि धैर्य दाखवून महामारीशी मुकाबला केला त्याबद्दल आपले अभिनंदन. आपणास माहीतच आहे कि महामारी मुळे सध्या जीवनाची गती धीमी झालेली आहे व सरकारी बंधनामुळे तर आम्हाला आमचे सगळे मासिक उत्सव थोडक्यात साजरे करावे लागत आहे. तरीसुद्धा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही श्रीराम पुरुषाच्या सेवेत कोणतीही कसूर ठेवलेली नाही. सगळे उत्सव आम्ही कमिटीच्या उपस्थित व्यवस्थितपणे पार पाडले आहे. कुळगतीचा  उत्सव ऐन लॉक डाऊन मध्ये आल्याने आम्हाला साजरा करता आला नाही. हल्लीच आम्ही कॉल प्रसाद घेऊन त्याबाबत विचारणा केली आहे. देवीने सदर उत्सव पुढच्या वर्षीच करण्याचा कौल दिलेला आहे.

महामारीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही बरीच कामे हातावेगळी केली. आमच्या सभासदांनी पुरस्कृत केलेलं अग्रशाळेच्या पाठीमागच्या चार खोल्या आम्ही दुरुस्त करून त्यांची रंगरंगोटी केली आहे. तसेच चारही खोल्यांमध्ये सामान ठेवण्यासाठी लोफ्ट बांधून घेतले आहे. त्यातील एक खोली कै. रामनाथ नारायण लोटलीकर कुटुंबीयांतर्फे पुरस्कृत केलेली आहे त्या खोलीत एक कोपऱ्यात स्वतंत्र संडास व प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर संपूर्ण खर्च कै. रामनाथ नारायण लोटलीकर कुटुंबीयांतर्फे करण्यात आलेला आहे. पाठीमागच्या अन्य तीन खोल्याच्या पुरस्कृत्याना माझी अशी विनंती आहे की त्यांनी पण पुढे येऊन खर्चाचा भार उचलून सदर खोल्यांचे नूतनीकरणास  मान्यता द्यावी. तसेच अग्र शाळेच्या मधोमध असलेला दरवाजा जो मंदिराच्या बाजूने उघडतो त्याला बाहेरच्या बाजूने छप्पर घातले ज्यामुळे पावसाचे पाणी आत येणार नाही. सध्या आम्ही एक नवीन भटजी नियुक्त केला आहे. त्याच्या निवासस्थानाच्या मुख्य दरवाजावर पण छप्पर घातले आहे. तसेच भटजीच्या स्वयंपाक खोलीचे नूतनीकरण करून सदर वास्तुची रंगरंगोटी पण केली आहे. ह्या  सगळ्या कामासाठी अंदाजे दोन लाख रुपये खर्च करण्यात आले.

यंदा आम्हाला अश्टमंगलाच्या परीहाराची  उरलेली कामे मात्र करता आली नाही. सध्या उत्पन्न पण कमी झालेले आहे. ती कामे आता आम्ही टप्प्याटप्प्यानी सुरू करणार आहोत. आम्ही आता ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. मुंबईहून आमच्या काही सभासदांनी देणग्या  पण पाठवून दिलेल्या आहेत.  आपण सुद्धा ह्याचा लाभ घ्यावा ही विनंती. अधिक माहितीसाठी खजिनदाराशी संपर्क साधावा.

आपण सर्वांना सुख,समृद्धी, सद्विवेक बुद्धी, यश आणि कीर्ती तसेच उदंड निरामय आयुष्य लाभो ही श्रीचरणी प्रार्थना.

आपले नम्र,

 श्री. दुर्गादास रामनाथ लोटलीकर

 अध्यक्ष