// श्री राम रुष प्रसन्न //
मंदिरा सभोवतालचे दगडी कुंपण फार जुन आणि जीर्ण झाल्यामुळे कमिटीने त्याच्या पुनर्बांधणीचा / दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. ह्या प्रकल्पाचा सगळा खर्च करण्याचा संकल्प आमच्या भगिनी मंडळाने सोडला आहे. कमिटीने त्याला मान्यता पण दिलेली आहे. सध्या भगिनी मंडळाकडे असलेली एक लाखाची कायम ठेव या कामासाठी वापरण्याचे योजिले आहे. उर्वरित रक्कम सगळ्या भगिनी कडून गोळा करण्यात येईल. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे पाच लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे. सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त देणगी देऊन प्रकल्पाचा भार उचलावा.
संस्थेचा वाढता खर्च व कायम ठेवीवरील कमी झालेले व्याज दर लक्षात घेऊन कमिटीने निर्णय घेतला आहे की सध्या चालू असलेली अन्नपूर्णा योजना आता आमच्या इच्छुक भगिनींना लागू करण्यात येईल ज्यामुळे त्यांची सुद्धा या योजनेत सहभागी होण्याची व भोजन व्यवस्थेत आपले योगदान देण्याची अनेक वर्षाची इच्छा पूर्ण होईल. आता भगिनींना अन्नपुर्णा योजनेसाठी आपल्या देणग्या देता येईल योजना डिसेंबर २०२१ महिन्यात सुरू झालेली आहे काही भगिनीनीं आपल्या देणग्या पण दिलेल्या आहेत आमच्या सगळ्या इच्छुक भगिनींना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त देणग्या देऊन भोजन व्यवस्थेत सहभागी व्हावे. योजनेची कमीत कमी रक्कम रुपये ५००० ठेवण्यात आलेली आहे.
श्री रामपुरुष मंदिर संस्थान समिती